LATEST MARATHI SUVICHAR

Latest Marathi Suvichar Thumbnail here
Latest Marathi Suvichar | Marathi Thoughts | Marathi Quotes | Motivational Quotes in MarathiLatest Marathi Suvichar

 

जीवनात कोणतीही गोष्ट गरजे पेक्षा जास्त मिळाली की ती विष बनते,

मग ती ताकत असो गर्व असो, पैसा असो वा भूक असो!

 

खर्च झाल्याचे दुःख नसते; हिशोब लागला नाही, की त्रास होतो..

 

येणाऱ्या संकटांवर मात कशी करता येईल याचा एवढा विचार करा की संकटाला ही येण्यासाठी विचार करावा लागेल !

 

ज्या दिवशी यंत्र विचार करू लागेल त्या दिवशी माणूस संपलेला असेल !

 

जो पर्यंत तुम्हांला नेमकं काय करायचं आहे हे कळत नाही तोपर्यंत तुम्ही काहीही करत राहाल!

 

ज्यावेळी देवाचा राग येईल त्यावेळी ऍक्सिडेंटल हॉस्पिटल मधून चक्कर मारून या, स्वतःला नशीबवान समजाल !

 

“खर्च करून उरलेल्या रकमेतून बचत करण्यापेक्षा, बचत करून उरलेल्या रकमेतून खर्च करा”….!!

 

Marathi Suvichar

 

साधं सोपं जगावं दिलखुश हसावं न लाजता रडावं राग आला तर चिडावं पण झालं गेलं तिथल्या तिथेच सोडावं!

 

जिभेचं वजन खुप कमी असतं; पण तिचा तोल सांभाळणं खुप कमी लोकांना जमतं!!

 

गर्दीतले सहभागी बनण्यापेक्षा गर्दीचे कारण बना!!

 

एका जोक वर जर तुम्ही पुन्हा-पुन्हा हसू शकत नाही. तर मग ज्यांनी तुम्हाला दुखावलं आहे त्यांच्यासाठी का पुन्हा पुन्हा रडता?

 

ब्लेड झाडे कापू शकत नाही तर कु-हाड केस कापू शकत नाही.

थोडक्यात… गोष्ट छोटी-मोठी असेल महत्त्व मात्र सारखेच आहे!

 

सावलीची किंमत जाणून घायची असेल तर उन्हातच जावे लागेल।

 

आशेचे निराशेचे असे अनेक प्रसंग येतात, पण विचारांचा भक्कम पाया असणारी माणसं कुठल्याही प्रसंगी ठामपणे उभी राहतात!!

 

MARATHI THOUGHTS

Marathi Quotes

 

कोणतेही कार्य अडथळ्यावाचून पार पडत नाही.

शेवटपर्यंत जे प्रयत्न करीत राहतात त्यांनाच यश प्राप्त होते!

 

माणसाच्या आयुष्यात दुःखापेक्षा सुख जास्त असते पण त्याला आकाशापेक्षा चमकणाऱ्या विजामध्येच जास्त इंटरेस्ट असतो!!

 

यश मिळे पर्यंत गप्प बसून राहा. कारण सिंह जर ओरडत राहिला तर त्याला शिकार मिळणार नाही !

 

जिंकणं आणि हारणं या दोन्हींसाठीही सारखीच ताकद लावावी लागते तर हरण्याच्या का मनात आणता?

 

स्वतः ला हसायच असेल तर  दुसर्याला रडवण लगेच बंद करावं!

 

जाळायला काहीच नसले, की पेटलेली काडीसुध्दा आपोआप विझते.

 

विचार परिपक्व झाले कि शब्दांचे रूप देऊन कागदावर उतरवता येतात!

 

Latest Marathi Quotes

 

माणसाला एखादी गोष्ट करायची असेल तर मार्ग सापडतो आणि करायची नसेल तर कारणं सापडतात..

 

जे तुम्हांला नावे ठेवण्याचा प्रयत्न करतात, त्यांना कामावर ठेवण्याचा तुम्ही प्रयत्न करा!!

 

स्वप्न म्हणजे काय? तर भळभळणाऱ्या जखमांवर केलेला उपाय!

 

द्वेषाचा चष्मा काढला की, सर्व जग प्रेमळ दिसायला लागतं !

 

ठाम राहा नाहीतर तुमच्यात आणि त्या वा-यावर उडणाऱ्या पाचोळ्यात काहीही फरक राहणार नाही !

 

आयुष्यात यश मिळते तेव्हा कळते कि आपण कोण आहोत पण अपयशी होतो तेव्हा कळते कि आपले कोण आहेत!!

 

Marathi Suvichar Images

 

जर तुम्ही कोणाला फसवण्यात यशस्वी झालात तर असं समजू नका की ती व्यक्ती किती मूर्ख होती, नीट समजून घ्या की त्या व्यक्तीचा तुमच्यावर किती विश्वास होता!

 

खुश होणं नाराज होणं हे केवळ तुमच्या दृष्टिकोनावर अवलंबून आहे !

 

शब्द देताना विचार करून द्या कारण एक छोटा शब्द तुमच्यावरील विश्वास संपवू शकतो !

 

तुमचं ध्येय हे तुमचं जीवन झालं की पाहिलेलं स्वप्न पूर्ण होतं!!

 

जे काम कोणीच करू शकत नाही ते काम कल्पनाशक्ती करू शकते !

 

प्रेम हे समुद्राच्या लाटांप्रमाणे असते कितीही दूर गेले तरी परत आपल्याकडेच येते!

 

MARATHI QUOTES LATEST MARATHI SUVICHAR

Marathi Suvichar Tulana

 

आपली इतरांशी बरोबरी करने योग्य नाही. कारण प्रत्येकाचा जीवन प्रवास हा वेगळा असतो!!

 

आनंद हा सर्वत्र फुकटच मिळत असतो तेव्हा तो अजिबात सोडू नका !

 

ज्यांना आपले यश पचत नाही, मग ते मित्र का असेनात त्यांना आयुष्यात स्थान देऊ नका!

 

उत्कृष्ट बदला घेणे म्हणजे स्वतःला सिद्ध करणे होय !

 

ज्या ठिकाणी तुमच्या कल्पनेला वाव मिळत नाही. त्या ठिकाणी अजिबात वेळ वाया घालवू नका!

 

रात्र नाही स्वप्न बदलते, दिवा नाही वात बदलते, मनात नेहमी जिंकण्याची आशा असावी कारण नशीब बदलो ना बदलो पण वेळ नक्कीच बदलते!!

 

Marathi Thoughts

 

केंव्हाच सोडून दिलं नशिबावर विश्वास ठेवणं, जिथे लोक बदलू शकतात तिथे नशिब काय चीज आहे..

 

यशाचा विचार जर पुढे ठेवला तर मागे लागलेलं अपयश तसंच मागेच राहून जातं!

 

अशी एखादी तरी कला शिका जी तुमच्याकडे आहे म्हणून लोक तुमच्यासाठी वेडे होतील

 

पायाला जर ठेच लागली तर दोष दगडाचा नाही, तुमच्या बेजबाबदार चालण्याचा आहे!

 

जीवनात हार कधीच मानु नका कारण पर्वतामधुन निघणार्या नदीने आजपर्यंत रस्त्यात कोणालाच विचारले नाही की समुद्र किती दुर आहे!

 

पैशासाठी काहीही करणार असाल तर काहीच करू नका कारण, तसं करून तुम्ही अपयशीच होणार आहात!

 

Good Quotes in Marathi

 

आनंदापेक्षाही मोठा असा एक आनंद आहे, तो त्यालाच मिळतो; जो स्वतःला विसरून इतरांना आनंदित करतो!

 

एखाद्या कामात एखादी व्यक्ती यशस्वी होत असेल तर त्याच कामात प्रत्येक व्यक्ती यशस्वी होऊ शकते !

 

दुसऱ्याकडे पाहून जगू नका. कालपर्यंत प्रौढी मिरवणारे आज परदेशात लपून बसलेले आहेत।

 

निर्जीव घड्याळ जर कुणासाठीच थांबत नसेल तर तुम्ही तरी का कुणासाठी थांबता?

 

वेळ मौल्यवान आहे, मूर्ख लोकांसाठी तो खर्च करू नका !

 

यशस्वी होण्याचा सर्वात सोपा मार्ग स्वतःला काय करायला आवडतं ते शोधा!

 

Latest Marathi Quotes Images

 

आयुष्य ही एक अशी ट्रेन आहे जी जन्मापासून मृत्यूपर्यंत सुख दुःखाच्या फलाटांवर थांबते

आणि आपल्याला अनुभवाचं तिकीट घेण्यासाठी प्रत्येक स्टेशनवर उतरायला भाग पडते!

 

इमानदारी आणि मेहनत कधीच वाया जात नाही त्याचे फळ उशिरा का होईना पण भेटते जरूर!!

 

घरातच शत्रू निर्माण केल्यामुळे बाहेरचा शत्रू न लढताही जिंकतो,

म्हणुन शिवतंत्र सांगते जोडता नाही आले तर जोडू नका पण आपल्या लोकांना तोडू नका!

 

पत्यांमधला ” जोकर ” आणि जवळच्या माणसांनी

दिलेली ” ठोकर ” कधीही डाव बदलू शकतात!

 

एकदा मनातून उतरलेली व्यक्ती पुन्हा कितीही चांगली वागली तरी ही ती पाहिल्या सारखी मनात जागा कधीच मिळवू शकत नाही!

 

समोरच्याचा पराभव करण्यापेक्षा त्याचं मन जिंका तो सर्वात मोठा विजय असेल!

 

Latest Marathi Suvichar on Love

 

तुमचे दोन गोड शब्द पुरेसे असतात आम्हाला आनंदी राहायला!

 

समोरच्याने आपल्याला समजण्याच्या आत त्याला आपली ताकद दाखवा!!

 

जर तुमचा स्वतःवरच विश्वास नसेल तर लोक तरी तुमच्यावर का विश्वास ठेवतील.

 

फक्त पुस्तकी ज्ञानच महत्वाचे असते तर जगातले बुद्धिमान लोक मागच्या बाकावर सापडलेच नसते !

 

फक्त नोकरी मिळावी म्हणून शिकत असाल तर तुम्ही मालक कधी बनणार?

 

दुस-यांसाठी डोळ्यात पाणी आलं की समजावं आपल्यात अजुन माणुसकी शिल्लक आहे!

 

Marathi Quotes on Friend

 

मैत्री आणि प्रेम मोठं नसते तर ते सांभाळनारी माणसं मोठी असतात!

 

कितीही जपून पाऊल टाकलं तरी ते चिखलात फसतंच त्याचप्रमाणे

कोणाशी कितीही चांगलं वागण्याचा प्रयत्न केला तरी काहीतरी वाईट घडतंच!

 

चुकीच्या बाजूला उभा राहण्यापेक्षा एकटं उभं रहाणं केव्हाही चांगलं!

 

भरलेला खिसा माणसाला दुनिया दाखवतो, रिकामा खिसा मात्र दुनियेतील माणसं दाखवतो!!

 

निवडलेला रस्ता जर इमानदारीचा असेल तर घाबरण्याचा प्रश्नच उरत नाही भले सोबत कुणी असो वा नसो!

 

सारखे-सारखे निर्णय बदलणाऱ्यांचं आयुष्य कधीही बदलत नाही!

 

Marathi Motivational images

 

कष्ट ही एक अशी किल्ली आहे की जी नशीबात नसलेल्या गोष्टींचे सुध्दा दरवाजे उघडते!

 

यशस्वी व्यक्तींच्या यशोगाथा वाचत बसाल तर उत्कृष्ट वाचक व्हाल, त्यांच्या गोष्टी अंमलात आणाल तर महान बनाल !

 

एखाद्याचं फक्त यश पाहू नका तर त्याला आलेल्या अडचणी पहा तुम्ही त्याच्यापेक्षाही यशस्वी व्हाल !

 

कायम तोट्याचा विचार करणारे कधीही नफ्यात येत नाहीत !

 

आजच्या काळात ज्याच्याकडे हिंमत आहे समाजात त्यालाच किंमत आहे !

 

अडचणींशिवाय जीवन आणि मिठा शिवाय जेवण बेचव आहे!

 

Marathi Quotes on Parents

 

आईचे प्रेम, वडिलांचे आशिर्वाद, बहिणीची माया, भावाचा पाठिंबा आणि

मित्रांची साथ ज्यांनी कमवल त्याच्या इतके श्रीमंत या पृथ्वीवर कोणी नाही!

 

जेव्हा आपण गप्प राहून सगळं सहन करत असतो तेव्हा सगळ्यांसाठी आपण खूपच चांगले असतो,

पण आपण एकदा जरी सत्य बोलायचा प्रयत्न केला, तर अचानक आपण सर्वात वाईट व्यक्ती ठरतो!

 

स्वप्न खूप मोठी असावीत, पण जग दाखवणा-या आई वडीलांपेक्षा नाही!

 

भविष्यकाळाचा एवढा पण विचार करू नये की, वर्तमानकाळातील जगणंच राहून जाईल!

 

उशी म्हणून डोक्याखाली जेव्हा आईची मांडी असते, ती येणारी झोप सर्वात शांत आणि सुंदर असते..!!

 

प्राण्यांना जर स्वप्ने पाहता आली असती तर ती कधीच कुणाची गुलाम राहिली नसती।

 

Marathi Suvichar for Mother and Father

 

आईच्या ममतेचा आणि बापाच्या क्षमतेचा अंदाज कधीच लागत नाही!

 

प्रत्येकाचंच मत ऐकत बसाल तर स्वतःचंच मत विसरून जाल!!

 

प्रामाणिकपणाच नसेल तर ज्ञान असूनहीं काही उपयोग नाही!

 

काय साध्य करायचं हे जर तुम्हांला माहीत असेल तर ते साध्य होणारच!

 

यशस्वी नेहमी संधी तर अपयशी नेहमी समस्या शोधत असतात !

 

प्रयत्न नेहमी गुपचूप करावेत कारण लोकांना तुमच्या परीक्षेपेक्षा रिझल्ट पाहण्यात जास्त इंटरेस्ट असतो।
MOTIVATIONAL QUOTES IN MARATHI

Marathi Suvichar 2 line

 

सुरूवात कशी झाली यावर ब-याच घटनांचा शेवट अवलंबून असतो

 

आयुष्याचा पेपर सोडवताना कॉपी करणारे नेहमी खालून पहिले असतात!!

 

जोपर्यंत तुम्ही स्वतःला सिद्ध करत नाहीत तोपर्यत तुम्हाला अभिमान बाळगण्याचा काहीही अधिकार नाही!

 

प्रत्येक वेळी जर जिंकण्याचाच विचार केला तर शिकण्याचा विचार आपोआप कमी होतो!

 

कडू बोलून गोड रिझल्ट देणारी माणसे ही फक्त गोड बोलणाऱ्यांपेक्षा कधीही चांगली!

 

आजच्या युगात ज्याच्याकडे कल्पनाशक्ती आणि इच्छाशक्ती ही शस्त्रे आहेत त्याला कुणीही हरवू शकत नाही!!

 

True sayings in Marathi

 

एवढ्या लवकर जगातली कोणतीच गोष्ट बदलत नाही जेवढ्या लवकर माणसाची वृत्ती आणि दृष्टी बदलते!!

 

शॉर्टकट मारून मिळालेलं यश हा फक्त एक अपघात असू शकतो!!

 

जोपर्यंत माणूस जिवंत आहे तोपर्यंत काहीही संपलेलं नसतं!!

 

तुमच्याजवळ काय नाही हे पाहण्याअगोदर तुमच्या जवळ काय आहे? हे अगोदर पहा!!

 

स्वप्न स्वप्नच ठेवायचं नसेल तर स्वप्नातून बाहेर येऊन कृती करावीच लागेल!!

 

लक्षात ठेवा संकुचित बुद्धी ही फक्त डबक्यातील बेडकाला दिलेली आहे माणसाला नाही!

 

Positive Thoughts in Marathi

 

तुम्ही स्वतःला जितकं सुखी समजाल तितकंच सुखी तुम्ही रहाल.

 

आपल्या विषयी वाईट बोलणारे बरेच लोक असतात त्यांच्याकडे लक्ष द्याल

तर विखुरले जाल. मनं शांत ठेवुन पुढे जाल तर नेहमी यशस्वी व्हाल!!

 

जे काही हृदयापासून निघतं तेच हृदयाला जाऊन भिडतं..!

 

टीकाकार हे तुमचे दोष शोधण्यासाठी जीवाचा आटापिटा करत असतात तेव्हा त्यांना नेहमी आदर द्या!

 

माणूस एवढा श्रीमंत कधीच होणार नाही की गेलेला क्षण तो विकत घेऊ शकेल!!

 

आयुष्य फार थोडं आहे त्यामुळे प्रत्येक क्षणाचा आनंद घेत चला!!

 

अन्न फेकताना विचार करा आपण जेवढे फेकतोय, तेवढे सुद्धा काहींच्या नशिबात नसते!

 

True Quotes in Marathi

 

ज्याच्यासाठी डोळ्यात अश्रुयावेत असा मित्र सहजासहजी सापडत नाही

आणि खरच जर कधी सापडला तर तो अश्रुच येवु देत नाही!!

 

समजवण्यापेक्षा समजून घेण्यामध्ये खरी परीक्षा असते, कारण समजवण्यासाठी अनुभवाचा कस लागतो, तर समजून घेण्यासाठी मनाचा मोठेपणा लागतो!

 

डिग्री आणि यश यांचा संबंध असता तर भारताला सचिन तेंडुलकर कधीच मिळाला नसता!

 

आहे ते नको आणि नाही ते हवे या इच्छेपुढं सगळं हतबल होऊन जातं!!

 

डोक्यावर पडण्यापेक्षा तोंडावर पडलेले कधीही चांगले दुसऱ्यांना त्रास तरी होत नाही!

 

मित्राने केलेली मदत बिनशर्त असावी, कारण शर्तीने करार होतात मैत्री नाही!

 

Nice Quotes in Marathi

 

आयुष्यात पुढे जाण्यासाठी उशीर झाला म्हणजे हरणारच असं नाही, अनेकदा उशीर झाल्याने वेग दुप्पट होतो!!

 

या जगात एकच गोष्ट सोपी आहे ती म्हणजे दुस-याला नावे ठेवणे!

 

दारिद्रय कमवण्यापेक्षा ऐश्वर्य कमवा दोन्हीलाही तेवढाच वेळ लागतो!!

 

खूप मोठे व्हायचंय? तर तुमच्या छंदाला बिजनेसमध्ये रुपांतरीत करा !

 

कोणाला दुखवताना हजार वेळा विचार करत जा कारण माणुस आपले चांगले क्षण कमी आणि वाईट क्षण जास्त लक्षात ठेवतो!!

 

आज जर संकटात असाल तर प्रयत्न करत राहा. उद्या नक्की सुख येणार आहे, कारण परिस्थितीला बसून राहण्याची मुभा नाही!

 

Marathi Suvichar on Life images

 

आयुष्यातील प्रत्येक व्यक्तिही फार मोलाची आहे

फक्त तिची किंमत ही वेळ आल्यावरच कळते!

 

फुल बनून हसत राहणे हेच जीवन आहे. हसता-हसता दुःख विसरून जाणे

हेच जीवन आहे. भेटून तर सर्वजण आंनदी होतात, पण न भेटता नाती जपणं हेच खर जीवन आहे!!

 

व्यवस्थित नाही म्हणण हे कौशल्य आहे. पण हो म्हणून काहीच न करणं ही मात्र कला आहे!!

 

पाहिलेलं स्वप्न पूर्ण होतं पडलेलं नाही!

 

कोणी टिकवून गेला, कोणी चुकवून गेला, कोणी आधार दिला तर कोणी फसवून गेला..

येणारे येत राहिले, जाणारे जात राहिले, परंतू प्रत्येक जण जगणे शिकवित गेला!!

 

स्वतः काढलेल्या सेल्फीत स्वतःचं तर दुसऱ्याने आपल्यासोबत काढलेल्या सेल्फीत यशाचं प्रतिबिंब दिसत असतं!

 

Best Life Quote in Marathi

 

आयुष्याच्या पुस्तकात सगळ्यात जास्त आनंद देणारं पानं म्हणजे बालपण!!

 

यशस्वी होण्यासाठी शिकणं आणि चुकणं दोन्हीही महत्वाचं आहे!!

 

ज्या हक्काने आपण आपला राग व्यक्त करतो, तेवढ्याच हक्काने आपले प्रेम व्यक्त करा, नाते अधिक सदृढ होईल!

 

आयुष्यात असा एखादा मित्र असावा ज्याला समजून सांगण्यासाठी शब्दांची गरज पडणार नाही!

 

वेळ जाण्याअगोदर वेळेला सांगा माझीही वेळ येणार आहे!!

 

आपण केलेल्या प्लॅन वर जर आपलाच भरोसा नसेल तर तो सक्सेस तरी कसा होणार?

 

Latest Marathi Suvichar for Life

 

समुद्र हा सर्वांसाठीच सारखाच असतो. काहीजण त्यातून मोती काढतात तर काहीजण मासे काढतात

आणि काहीजण फक्त पाय ओले करतात. हे विश्व सुद्धा सर्वांसाठी सारखेच आहे, फक्त तुम्ही त्यातून काय घेता हे महत्वाचे!

 

माणसं ओळखायची आणि पारखायची असतील तर त्यांच्या मानविरुद्ध एकदा वागुन बघा. तुम्हाला तुमची जागा तिथल्या तिथे समजेल

 

माणुस काय आहे? हे महत्त्वाचं नाही पण माणसामध्ये काय आहे, हे खूप महत्त्वाचा आहे!

 

वाईट वेळ निघून जाते परंतु जाताना चांगल्या-चांगल्या लोकांच खरं रूप दाखवून जाते!!

 

जगण्याचा आनंद हा आपल्या अवती भवतीच असतो, फक्त त्याला शोधता आलं पाहीजे!!

 

माणसाजवळ काहीही नसलं तरी संयम असावा आणि सर्व काही असलं तरी नम्रता असावी!

 

Marathi Suvichar on Relationship

 

जीवनात नातं असणं आवश्यक आहे पण त्या नात्यातही जीव असणं गरजेचं आहे!

 

दुस-यांच चांगलं करण्यासाठी कोणत्याही पदवीची गरज नसते, फक्त मनात चांगली भावना लागते!!

 

खुप सुंदर असतात ते क्षण ज्यात मित्र सोबत असतात परंतू त्यातही सुंदर असतात ते क्षण जेव्हा दुर राहूनही ते आपली अठवण काढतात!

 

अतीविचार हे दुःखाचे सर्वात मोठे कारण आहे!

 

आपण आपले भविष्य बदलू शकत नाही परंतु आपल्या सवयी बदलू शकतो, आणि नक्कीच आपल्या सवयी आपलं भविष्य बदलतील!!

 

जर तुम्हाला वाटत असेल तुमचा पराभव होईल तर वाट पाहण्याची गरज नाही तो होणारच आहे !

 

Small Life Quotes in Marathi

 

छोट्याशा आयुष्यातून एक गोष्ट नक्की शिका, स्वप्नात असो वा सत्यात, डोळे लवकर उघडलेले कधीही चांगलं!!

 

दुसऱ्या कुणाच्या सांगण्यावरून जर तुम्ही एखाद्या व्यक्ती बद्दल मनात राग धरत असाल, तर आयुष्याच्या शाळेत तुम्ही आजून खूप लहान आहात!!

 

जर परिस्थीवर मजबूत नियंत्रण असेल तर विष ओकणारे पण तुमचे काही उखडू शकत नाही!

 

किती दिवसाचे आयुष्य असते? आजचे अस्तित्व उद्या नसते मग जगावे ते हसून-खेळून

कारण या जगात उद्या काय होईल ते कोणालाच माहित नसते म्हणुन आनंदी रहा!!

 

गंभीर परिस्थितीत खंबीर राहणारेच काहीतरी मोठं करतात!!

 

Warren Buffet Quotes in Marathi

 

प्रामाणिकपणा हे खूप महागडी वस्तू आहे, त्याची हलक्या लोकांकडून अपेक्षा करू नका – वॉरेन बफेट

 

वृत्ती स्वच्छ आणि उद्दिष्ट योग्य असेल तर कोणत्या ना कोणत्या रुपात देव मदत करतोच!!

 

वाईट वेळ निघून जाते परंतु जाताना चांगल्या-चांगल्या लोकांच खरं रूप दाखवून जाते!!

 

भरोसा श्वासांवर सुद्धा नसतो आणि आपण लोकांवर ठेवतो !!

 

चांगले मन व चांगला स्वभाव हे दोन्ही आवश्यक असतात. चांगल्या मनाने काही नाती जुळतात आणि चांगल्या स्वभावाने ती नाती आयुष्यभर टिकतात!

 

Life Thought in Marathi

 

आयुष्याची गणितं खरंतर बोटांवर सोडवण्याइतकी सोप्पी असतात

पण भीतीचे आकडे, समाजाची काळजी आणि क्षणिक सुखाची ओढ अख्खा हिशोब चुकवतात!!

 

वेळेची किंमत वर्तमानपत्राला विचारा; जो सकाळी ४ रुपयाला असतो तोच रात्री रद्दीत ४ रू किलोने असतो.. म्हणून जीवनात वेळेला महत्त्व दया!!

 

आपण जर पेन्सिल बनून कोणाचा आनंद लिहू शकलो नाही, तरी रबर बनून दुःख खोडण्यास नक्कीच मदत करू शकतो!!

 

परिस्थिती बदलण्याची ताकद केवळ कृतीमध्ये असते!!

 

वळणा-वळणाचे आयुष्य असावे, त्यात काटेही असावे वेदनाही असावी पण विश्वास तोडणारं कोणी नसावं!!
Next..

 


YOU MIGHT ALSO LIKE

x