Best & Latest Marathi Suvichar Images with Marathi Font
Latest Marathi Suvichar
Marathi Thoughts, Marathi Quotes, Marathi Quotes on Life, Marathi Suvichar, Motivational Quotes in Marathi, Marathi Suvichar Sangrah, Inspiring Quotes in Marathi with Images, Educational Quotes in Marathi Language. Welcome to our blog. Here you’ll find lots of stuff for sharing on your social networks. Sharing thoughts through social media like WhatsApp, Facebook, and Instagram are the most popular networks. Here we are presenting Latest Marathi Suvichar. Read, get motivated, and share if you like.
Latest Marathi Suvichar Images
जीवनात कोणतीही गोष्ट गरजे पेक्षा जास्त मिळाली की ती विष बनते,
मग ती ताकत असो गर्व असो, पैसा असो वा भूक असो!
साधं सोपं जगावं दिलखुश हसावं न लाजता रडावं राग आला तर चिडावं पण झालं गेलं तिथल्या तिथेच सोडावं!
कोणतेही कार्य अडथळ्यावाचून पार पडत नाही.
शेवटपर्यंत जे प्रयत्न करीत राहतात त्यांनाच यश प्राप्त होते!
माणसाला एखादी गोष्ट करायची असेल तर मार्ग सापडतो आणि करायची नसेल तर कारणं सापडतात..
जर तुम्ही कोणाला फसवण्यात यशस्वी झालात तर असं समजू नका की ती व्यक्ती किती मूर्ख होती, नीट समजून घ्या की त्या व्यक्तीचा तुमच्यावर किती विश्वास होता!
Marathi Thoughts
आपली इतरांशी बरोबरी करने योग्य नाही. कारण प्रत्येकाचा जीवन प्रवास हा वेगळा असतो!!
केंव्हाच सोडून दिलं नशिबावर विश्वास ठेवणं, जिथे लोक बदलू शकतात तिथे नशिब काय चीज आहे..
जीवनात हार कधीच मानु नका कारण पर्वतामधुन निघणार्या नदीने आजपर्यंत रस्त्यात कोणालाच विचारले नाही की समुद्र किती दुर आहे!
आनंदापेक्षाही मोठा असा एक आनंद आहे, तो त्यालाच मिळतो; जो स्वतःला विसरून इतरांना आनंदित करतो!
आयुष्य ही एक अशी ट्रेन आहे जी जन्मापासून मृत्यूपर्यंत सुख दुःखाच्या फलाटांवर थांबते
आणि आपल्याला अनुभवाचं तिकीट घेण्यासाठी प्रत्येक स्टेशनवर उतरायला भाग पडते!
इमानदारी आणि मेहनत कधीच वाया जात नाही त्याचे फळ उशिरा का होईना पण भेटते जरूर!!
घरातच शत्रू निर्माण केल्यामुळे बाहेरचा शत्रू न लढताही जिंकतो,
म्हणुन शिवतंत्र सांगते जोडता नाही आले तर जोडू नका पण आपल्या लोकांना तोडू नका!
Marathi Quotes
पत्यांमधला ” जोकर ” आणि जवळच्या माणसांनी
दिलेली ” ठोकर ” कधीही डाव बदलू शकतात!
एकदा मनातून उतरलेली व्यक्ती पुन्हा कितीही चांगली वागली तरी ही ती पाहिल्या सारखी मनात जागा कधीच मिळवू शकत नाही!
तुमचे दोन गोड शब्द पुरेसे असतात आम्हाला आनंदी राहायला!
मैत्री आणि प्रेम मोठं नसते तर ते सांभाळनारी माणसं मोठी असतात!
कितीही जपून पाऊल टाकलं तरी ते चिखलात फसतंच त्याचप्रमाणे
कोणाशी कितीही चांगलं वागण्याचा प्रयत्न केला तरी काहीतरी वाईट घडतंच!
निवडलेला रस्ता जर इमानदारीचा असेल तर घाबरण्याचा प्रश्नच उरत नाही भले सोबत कुणी असो वा नसो!
कष्ट ही एक अशी किल्ली आहे की जी नशीबात नसलेल्या गोष्टींचे सुध्दा दरवाजे उघडते!
आईचे प्रेम, वडिलांचे आशिर्वाद, बहिणीची माया, भावाचा पाठिंबा आणि
मित्रांची साथ ज्यांनी कमवल त्याच्या इतके श्रीमंत या पृथ्वीवर कोणी नाही!
Marathi Suvichar
जेव्हा आपण गप्प राहून सगळं सहन करत असतो तेव्हा सगळ्यांसाठी आपण खूपच चांगले असतो,
पण आपण एकदा जरी सत्य बोलायचा प्रयत्न केला, तर अचानक आपण सर्वात वाईट व्यक्ती ठरतो!
स्वप्न खूप मोठी असावीत, पण जग दाखवणा-या आई वडीलांपेक्षा नाही!
उशी म्हणून डोक्याखाली जेव्हा आईची मांडी असते, ती येणारी झोप सर्वात शांत आणि सुंदर असते..!!
आईच्या ममतेचा आणि बापाच्या क्षमतेचा अंदाज कधीच लागत नाही!
Motivational Quotes in Marathi
सुरूवात कशी झाली यावर ब-याच घटनांचा शेवट अवलंबून असतो
एवढ्या लवकर जगातली कोणतीच गोष्ट बदलत नाही जेवढ्या लवकर माणसाची वृत्ती आणि दृष्टी बदलते!!
तुम्ही स्वतःला जितकं सुखी समजाल तितकंच सुखी तुम्ही रहाल.
आपल्या विषयी वाईट बोलणारे बरेच लोक असतात त्यांच्याकडे लक्ष द्याल
तर विखुरले जाल. मनं शांत ठेवुन पुढे जाल तर नेहमी यशस्वी व्हाल!!
ज्याच्यासाठी डोळ्यात अश्रुयावेत असा मित्र सहजासहजी सापडत नाही
आणि खरच जर कधी सापडला तर तो अश्रुच येवु देत नाही!!
आयुष्यात पुढे जाण्यासाठी उशीर झाला म्हणजे हरणारच असं नाही, अनेकदा उशीर झाल्याने वेग दुप्पट होतो!!
कोणाला दुखवताना हजार वेळा विचार करत जा कारण माणुस आपले चांगले क्षण कमी आणि वाईट क्षण जास्त लक्षात ठेवतो!!
आयुष्यातील प्रत्येक व्यक्तिही फार मोलाची आहे
फक्त तिची किंमत ही वेळ आल्यावरच कळते!
फुल बनून हसत राहणे हेच जीवन आहे. हसता-हसता दुःख विसरून जाणे
हेच जीवन आहे. भेटून तर सर्वजण आंनदी होतात, पण न भेटता नाती जपणं हेच खर जीवन आहे!!
कोणी टिकवून गेला, कोणी चुकवून गेला, कोणी आधार दिला तर कोणी फसवून गेला..
येणारे येत राहिले, जाणारे जात राहिले, परंतू प्रत्येक जण जगणे शिकवित गेला!!
आयुष्याच्या पुस्तकात सगळ्यात जास्त आनंद देणारं पानं म्हणजे बालपण!!
समुद्र हा सर्वांसाठीच सारखाच असतो. काहीजण त्यातून मोती काढतात तर काहीजण मासे काढतात
आणि काहीजण फक्त पाय ओले करतात. हे विश्व सुद्धा सर्वांसाठी सारखेच आहे, फक्त तुम्ही त्यातून काय घेता हे महत्वाचे!
जीवनात नातं असणं आवश्यक आहे पण त्या नात्यातही जीव असणं गरजेचं आहे!
छोट्याशा आयुष्यातून एक गोष्ट नक्की शिका, स्वप्नात असो वा सत्यात, डोळे लवकर उघडलेले कधीही चांगलं!!
Marathi Suvichar Sangrah
किती दिवसाचे आयुष्य असते? आजचे अस्तित्व उद्या नसते मग जगावे ते हसून-खेळून
कारण या जगात उद्या काय होईल ते कोणालाच माहित नसते म्हणुन आनंदी रहा!!
गंभीर परिस्थितीत खंबीर राहणारेच काहीतरी मोठं करतात!!
प्रामाणिकपणा हे खूप महागडी वस्तू आहे, त्याची हलक्या लोकांकडून अपेक्षा करू नका – वॉरेन बफेट
वृत्ती स्वच्छ आणि उद्दिष्ट योग्य असेल तर कोणत्या ना कोणत्या रुपात देव मदत करतोच!!
वाईट वेळ निघून जाते परंतु जाताना चांगल्या-चांगल्या लोकांच खरं रूप दाखवून जाते!!
चांगले मन व चांगला स्वभाव हे दोन्ही आवश्यक असतात. चांगल्या मनाने काही नाती जुळतात आणि चांगल्या स्वभावाने ती नाती आयुष्यभर टिकतात!
आयुष्याची गणितं खरंतर बोटांवर सोडवण्याइतकी सोप्पी असतात
पण भीतीचे आकडे, समाजाची काळजी आणि क्षणिक सुखाची ओढ अख्खा हिशोब चुकवतात!!
वळणा-वळणाचे आयुष्य असावे, त्यात काटेही असावे वेदनाही असावी पण विश्वास तोडणारं कोणी नसावं!!
You Might Also Like
मराठी टोमणे
Best & Latest Comedy Marathi Jokes with HD Images