Best & Latest Comedy Marathi Jokes Images with Marathi Font
Comedy Marathi Jokes
If you are looking for the Best Funny Quotes in Marathi, then here you’ll find the best Comedy Marathi Jokes and Marathi Tomne. We have provided here Marathi Tomne and Comedy Marathi Jokes in both Marathi font and in Marathi Jokes Images form. So read, laugh yourself with Comedy Marathi Jokes and make others laugh too.
Marathi Tomne
मूर्ख असल्याचे सिद्ध करण्याची संधी प्रत्येकाला मिळते. काही जण त्यातही घाई करतात..
हल्ली राजकारणात कार्यकर्ते कमी आणि काडयाकर्ते जास्त वाढत चालले आहेत!!
माणसाचं नाक डोळे चांगले असावेत बाकी फोटो एडिटरवर सोडून द्यावे !
फॅन 4 नंबर वर चालवून, अंगावर चादर घेऊन आणि एक पाय बाहेर काढून Temperature बॅलन्स करण्याची कला फक्त आपण भारतीयांकडेच असते!!
एक पायरी सोडून चालणाऱ्याचे पाय नेहमी दुखतात !
दिसणं आणि असणं यातील फरक कळला की फसणं बंद होतं !
माझ्या स्वभावात कधी बदल जाणवला तर वाईट वाटून घेऊ नका कारण,
लोकांच्यात झालेला बदल मी मोठ्या मनाने Accept केलाय..
पूर्वी मी खूप कष्टाळू होतो आता कष्ट टाळू झालोय..
पोरगं बाहेर गावी राहतंय!! मग काय मजाच करत असणार…
असं म्हणणाऱ्यांना एक महिना सक्तीने मेसचं जेवण घालायला पाहिजे.
मग कळेल १० रूपयाचा वडापाव एवढा का फेमस आहे!!
निष्ठावान कार्यकर्ता म्हणजे काय?
उत्तर- कढीपत्ता!! कोणतीही भाजी बनवण्याआधी गरम तेलात यालाच सगळ्यात पहिले टाकतात आणि त्याच भाजीला खाताना सगळ्यात पहिले यालाच उचलुन बाहेर फेकतात!!
उधारीचे पोते सव्वाहात रिते…
कलीयुगाचे पर्व आहे, प्रत्येकालाच इथे गर्व आहे!!
दुःखी असतानाही सुखी दाखविण्याचं हक्काचं ठिकाण म्हणजे व्हॉट्सअॅप स्टेटस होय!
जिसका कोई नहीं होता उसका मोबाईल होता है और
जिसका मोबाईल होता है वह किसी का नहीं होता
व्हाटसएप्प “मी ONLINE नाही आहे”……. हा फ़क्त तुमच्या डोळ्यांचा भास आहे
Marathi Jokes Images
लाखमोलाचा सल्ला कुणी दिला तर मी त्याची परतफेड कोटीमध्ये करतो!!
पैसा हेच सर्वस्व नव्हे… मास्टर कार्ड, व्हिसा कार्डही आहेत जगात..!!
दिवसेंदिवस चहाच्या टपरीवर चहाचे कप इतके बारीक होत चाललेत की समजत नाहीये , चहा पितो आहे की ” पोलिओ ” चा डोस!!
लाखाशिवाय बात नाही अन् वडापाव शिवाय खात नाही…
प्रत्येक गोष्टीला अंत आहे म्हणून भाऊ शांत आहे
गाडी जोरात चालवताना मुलींकडे पाहू नका कारण त्या तुम्हाला पहायला कधीही दवाखान्यात येणार नाहीत !
हल्ली कुणी कविता करायला लागलं की उगीचच प्रेमभंगाची शंका येते!!
नवीन व्हाॅट्सअप ग्रुप कुणी ओपन केला की पोस्ट करणार्र्यांपेक्षा लेफ्ट होणार्यांचीच संख्या जास्त असते !
पाय ओढण्याऐवजी फक्त हाताला धरून ओढा.. पहा सगळेच पुढे जातील!
आयुष्य सुंदर आहे फक्त पोस्ट केलेल्या फोटोला लाईक्स मिळाल्या पाहिजेत!!
लगाया बॉम्ब और बजा लवंगी..!!
थंड हवेच्या ठिकाणी जायचे असेल तर खिसा गरम पाहिजे..
बोटांनी दात घासल्याने फक्त बोटेच स्वच्छ होतात, दात नाही..
सर्वात चांगले पाहूणे तेच की जे कधीच पाहूणचार घेत नाहीत, येतो म्हणतात पण येत नाहीत!
You Might Also Like
मराठी सुविचार
Best & Latest Marathi Suvichar Images with Marathi Font